• स्वतःच्या न्याय व हक्कासाठी झालेल्या नेवाळी आंदोलनादरम्यान जखमी आंदोलकांना सर्वोतपरी वैद्यकीय मदत करून आंदोलक शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेऊन शेतजमिनी शेतकर्‍यांना परत मिळवून देण्याकरिता ठोस उपाययोजना करण्याबाबत मुख्यमंत्री महोदय व संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून प्रसंगी विधानभवनात आंदोलन केले.
  • भीमा कोरेगाव प्रकरणामुळे कल्याण पूर्वेत दोन्ही समाजातील निर्माण झालेला सामाजिक तणाव दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आंदोलकांनी वरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांकडे आग्रही मागणी केली.
  • चक्की नाका ते नेवाळी श्रीमलंग गड या मुख्य रस्त्याची झालेली दुरावस्था यामुळे सतत निर्माण होणारी वाहतूक कोंडी व नेहमी होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी रस्ता रुंदीकरण करून व डांबरीकरण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून प्रसंगी प्रशासनाच्या विरोधात उपोषण करून सदर रस्त्याचे काम करून घेतले.
  • कल्याण स्टेशन पासून कल्याण पूर्वेत सुमारे 1 किलोमीटर रेल्वे यार्डातून पाणी यावे लागत होते. मालगाड्यांच्या वाहतुकीमुळे थांबून राहावे लागत होते अथवा धाडस करून मालगाडी ओलांडून जावे लागत होते. सदर स्काय वॉक साठी स्वतः आमदार नसताना सन 2005 पासून सातत्याने प्रयत्न करून एम.एम.आर.डी.ए.च्या माध्यमातून कल्याण पूर्व येथे स्कायवाप प्रकल्प मंजूर करून काम तातडीने सुरू करून घेतले. संथ गतीने होत असलेल्या स्कायवॉकच्या कारणासाठी संबंधित विभागाची पाठपुरावा करून प्रसंगी महापालिका विरोधात उपोषण करून स्कायवॉकचे काम पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करून घेतला.