• कल्याण पूर्व मतदारसंघातील पाण्याची समस्या असलेल्या ठिकाणी नागरिकांसाठी कूपनलिका खोदून हँडपंप बसवण्यासाठी 18 लक्ष 50 हजार आमदार निधी उपलब्ध करून दिला आहे.
  • ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्याकरिता मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये गावाचा समावेश करून तीन कोटी 82 लक्ष निधी मंजूर करून घेतला.
  • ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांसाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून आणला आहे या निधीतून रस्त्यांचे कामे करण्यात आलेली आहेत व काही कामे प्रस्तावित आहेत.
  • ग्रामीण भागात स्मशानभूमी, साकव, शेततळे, समाज मंदिर, सामाजिक सभागृह बनविण्यात आले आहेत.
  • ग्रामीण भागात विजेची समस्या सोडविण्यासाठी जास्त क्षमतेचे विद्युत ट्रांसफार्मर बसविण्यात आले आहेत, तसेच जुन्या व जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या व वीजवाहक तारा बदलण्यात आल्या आहेत.
  • अंबरनाथ तालुक्यातील खरड ग्रामपंचायत हद्दीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन शिवमंदिर आस ‘क’ वर्ग तिर्थ क्षेत्रांमध्ये समावेश करून तीर्थक्षेत्र विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत.
  • आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत अंबरनाथ तालुक्यातील भोसरी हे गाव दत्तक घेऊन गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.
  • अंबरनाथ तालुक्यातील (MIDC) पाईप लाईन टाकण्यासाठी, कुशिवली पाटबंधारेसाठी, सामाईक भराव भूमी प्रकल्प व विरार ते अलिबाग पर्यंतची बहुउद्देशीय वाहतूक मार्गीकेसासाठी बाधित झालेल्या भूमिपुत्र शेतकऱ्यावर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी भूमिपुत्र शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी वारंवार बैठका घेऊन व पत्रव्यवहार करून सर्वतोपरी मदत केली.