• प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना अंतर्गत नागरिकांना मोफत आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड बनवून दिले.
 • महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना (पूर्वीच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने) अंतर्गत 25000 हून अधिक नागरिकांना मोफत हेल्थ कार्ड बनवून दिले.
 • मुख्यमंत्री सहायता निधी व महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत गंभीर आजारावरील रुग्णाच्या उपचारासाठी सुमारे दोन करोड होऊन अधिक रुपयांची वैद्यकी आर्थिक मदत मिळवून दिली.
 • इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत इमारत व इतर बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळवून दिला.
 • मुद्रा योजनेअंतर्गत लघु उद्योगांना व्यवसायासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले.
 • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत नागरिकांचा मोफत अपघाती विमा काढून दिलेला आहे.
 • प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना मोफत गॅस सिलेंडर चे वाटप करण्यात आले आहे.
 • घरेलू कामगार योजनेअंतर्गत घर काम करणाऱ्या महिलांना मोफत घरेलू कामगारांचे ओळख पत्र काढून देऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला.
 • 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना बस प्रवासात सवलत मिळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळामार्फत मोफत बस पास काढून देण्यात आले.
 • विजेची बचत व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या डी.ई.एल.पी. या योजने अंतर्गत एल.ई.डी. बल्ब चे वाटप करण्यात आले.
 • बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने कौशल्य विकास योजने अंतर्गत प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
 • बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना मोफत अर्थ भरण्यास सहकार्य करण्यात आले.