• कल्याण पुर्व मतदारसंघात विविध रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून विविध भेट अंतर्गत 52 करोड 55 लक्ष रुपये इतका निधी मंजूर करून आणले यातून काही कामे करण्यात आली असून काही प्रस्तावित आहेत.
 • एम. एम. आर. डी. ए. अंतर्गत मोठ्या रस्त्याचे काम करण्यासाठी 166 कोटी 64 लक्ष निधी मंजूर करून आणला आहे.
 • कल्याण पुर्वेतील तमाम माझ्या आंबेडकरी जनतेसाठी ड प्रभाग क्षेत्रात कार्यालयाजवळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी 50 लक्ष निधी राज्य शासनाकडून मंजूर करून आणला असून याबाबतच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवले असून लवकरच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करून लवकरात लवकर स्मारक उभे करण्यात येईल.
 • कल्याण पुर्वेतील नांदिवली येथील तलावाचे सुशोभीकरण करणे व नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक बनविण्यासाठी 75 लक्ष निधी राज्य शासनाकडून मंजूर करून आणला असून लवकरच या कामास सुरुवात करण्यात येईल. असुन लवकरच या कामास सुरुवात करण्यात येईल.
 • कल्याण पुर्वेतील 100 फुटी रोड जवळील आरक्षण क्रमांक 299 मध्ये पन्नास लक्ष निधीमधून मातीचा भराव करून व वॉल कंपाऊंड बनवून मैदान बनविण्यात आलेले आहे व आणखी पन्नास लक्ष विशेष निधी राज्य शासनाकडून मंजूर करून आणला असुन लवकरच सुसज्ज असे मनोरंजनाचे मैदान विकसित करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल.
 • कल्याण पुर्वेतील खडेगोळवली येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यान आरक्षण क्रमांक 335 येथे 75 लक्ष विशेष निधीमधून मातीचा भराव करून वॉल कंपाउंड बनवून मैदान बनविण्यात आलेले आहे.
 • अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील 2515 हेड अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी 17 करोड 65 लक्ष रुपयांचा निधी मधून रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे.
 • अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात 3054 हेड अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी सहा करोड पन्नास लक्ष रुपयांच्या निधीतून रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे.
 • अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी एक कोटी 90 लक्ष निधीमधून साखव बनविण्यात आले आहेत.
 • कल्याण पुर्व मतदार संघातील अल्पसंख्यांक विकास 65 लक्ष निधीमधून रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहेत.
 • कल्याण पुर्वेतील कचरा उचलण्यासाठी प्रभाग क्षेत्र कार्यालयांना 17 लक्ष आमदार निधी मधून तीन घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
 • चिंचपाडा येथील गणेश घाट सुशोभिकरण करण्यासाठी वीस लक्ष निधी उपलब्ध करून दिलेला आहे व या गणेश घाटाचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे.
 • कल्याण पुर्वेतील नागरिकांसाठी पंधरा लक्ष अंधार निधीमधून सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.
 • कल्याण पुर्वेतील जुन्या व जीर्ण झालेल्या पिण्याच्या पाईपलाईन मधून होणारा होणाऱ्या दूषित पाणी पुरवठा यामुळे नागरिकांमध्ये जलजन्य आजारात वाढ झालेली होती. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे व जलजन्य आजारांचे प्रमाण कमी व्हावे तसेच पाणीटंचाईग्रस्त भागात नवीन पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी 2 कोटी 26 लक्ष निधी उपलब्ध करून नवीन पाईपलाईन टाकण्यात आलेल्या आहेत.
 • कल्याण पुर्वेतील नागरिकांसाठी 24 लक्ष आमदार निधीतून निधी ‘जे’, ‘ड’ व ‘आय’ प्रभाग क्षेत्र कार्यालय यांना स्वर्गरथ तसेच शववाहिका देण्यात आलेल्या आहेत.
 • कल्याण पुर्व शहरातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी 44 कोटी निधी मंजूर करून घेतला आहे.
 • ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्याकरिता पेयजल योजनेमध्ये गावाचा समावेश करून तीन कोटी 82 लक्ष निधी मंजूर करून घेतला.
 • कल्याण पुर्व मतदारसंघातील पाण्याची समस्या असलेल्या ठिकाणी नागरिकांसाठी कूपनलिका खोदून हांडपंप बसवण्यासाठी 18 लक्ष 50 हजार आमदार निधीतून उपलब्ध करून दिला.
 • नवीन स्मशानभूमी बनवण्यासाठी व तसेच सुशोभीकरण करण्यासाठी २० लक्ष आमदार निधी उपलब्ध करून दिला आहे.
 • कल्याण पुर्व मतदारसंघात 87 लक्ष आमदार निधी मधून नऊ ठिकाणी नवीन शौचालय बनविण्यात तसेच जुन्या शौचालय दुरुस्ती करण्यात आलेली आहेत.
 • सामाजिक सभागृह समाज मंदिर बनविण्यासाठी 2 कोटी 45 लक्ष आमदार निधी देण्यात आलेला आहे.
 • महापालिका क्षेत्रात नागरी अर्थ संख्या दलित वस्ती मध्ये सुविधा पुरविणे (विशेष घटक योजना) अंतर्गत दलित वस्ती असलेल्या ठिकाणी 2 कोटी 85 लक्ष निधी मधून कल्याण पुर्वेतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे.
 • उल्हासनगर अंबरनाथ ग्रामीण तसेच कल्याण पुर्वेतील मतदारसंघात आमदार निधी मधून साळी वस्त्यांमध्ये रस्ते पायवाटा गटारे तसेच आवश्यक ठिकाणी वर पेव्हर ब्लॉक बसविणे आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना बसवण्यासाठी बाके पुरविण्यात आलेली आहेत.
 • विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी कल्याण पुर्व मतदारसंघातील शाळांना आमदार निधीमधून संगणक संच तसेच डिजिटल वर्ग खोली बनविण्यात आल्या आहेत.
 • कोळसेवाडी मधील दादासाहेब गायकवाड मैदानावर प्रेक्षक गॅलरी बांधण्यासाठी एक कोटी 25 लक्ष रुपये उपलब्ध करून दिले आहेत.
 • ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामासाठी 2 कोटी निधी मधून मंजूर करून घेतला आहे.
 • कोकण ग्रामीण पर्यटन कार्यक्रमा अंतर्गत श्री मंगल गडच्या विकासासाठी 50 लक्ष निधी मंजूर केला आहे.
 • ग्रामीण दलित वस्ती योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामासाठी 93 लक्ष निधी मंजूर केला आहे.
 • प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामासाठी सहा कोटी 20 लक्ष निधी मंजूर केला आहे.
 • कल्याण पुर्व येथील नागरिकांना घराचे व दुकानाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी कल्याण पश्चिम येथे जावे लागत होते रजिस्ट्रेशन कार्यालय कल्याण पुर्ववत सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून कल्याण पुर्व यासाठी मंजूर करून घेतले व आता ते कार्यालय कल्याण पुर्वेतील गावदेवी मंदिराजवळ सुरू करण्यात आले आहे.
 • कल्याण पुर्वेतील नागरिकांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून शिधावाटप कल्याण करून घेतले आहे लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
 • वालधुनी नदीचा विकास जलदगतीने करण्यासाठी व नदीच्या संवर्धनासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत निधी उपलब्ध करून देणे बाबत पाठपुरवठा सुरू आहे.
 • चक्की नाका ते नेवाळी नाका या श्री मलंग मुख्य रस्त्याची व श्रीराम ते चक्कीनाका या पुन्हा रिंगरोड या रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबाबत या रस्त्याच्या दुरुस्तीचे संदर्भात सतत पाठपुरावा करून प्रसंगी महापालिका प्रशासनाच्या विरोधात उपोषण करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. या मुख्य रस्त्यावरील रहदारी व वाहतूक थंडीचा विचार करता या रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यासाठी संबंधित बापाची पाठपुरवठा करून सदर चक्की नाका ते निवळी नका या श्रीमलंग रस्त्याचे वर श्रीराम ते पूनालिंग या रस्त्याचे काम करण्यात आलेले आहे.
 • 67 लक्ष आमदार निधी मधून ठिकाणी नवीन व्यायाम शाळा बनवून साहित्य देण्यात आलेले आहे व त्यांचे लक्ष आमदार निधी मधून याठिकाणी नवीन ओपन जिम बनविण्यात आलेल्या आहेत.
 • आदेश लक्ष आमदार निधी मधून ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाजवळ व प्रभाग क्रमांक 40 शिवाजीनगर प्रभागात नवीन वाचनालयात बनवण्यात आलेली आहेत तसेच ग्रंथालयांना पुस्तके घेण्यासाठी २ लक्ष 50 हजार इतका निधी मंजूर करून दिला आहे.
 • ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाजवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी जेष्ठ नागरिक कट्टा बनवण्यासाठी आठ लक्ष आमदार निधी दिला आहे.
 • 170 लक्ष आमदार निधी मधून आमदार संघात मातीचा भराव करून उद्यान व मैदान विकसित करण्यात आलेले आहे.
 • राज्य शासनाच्या पाठपुरवठा करून ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाजवळ 75 लक्ष निधीमधून ज्येष्ठ नागरिकांना नाना-नानी पार्क व जॉगिंग ट्रॅक व बगीचा बनविण्यात आला आहे.