• राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सवाचे कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये भव्यदिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते यात सुमारे पंचवीस हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला.
  • कल्याण शहराचे नाव लौकिक करण्यासाठी व खेळाडूंना आपले गुण कौशल्य दाखविण्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रीडा साहित्य व किट देण्यात येते तसेच देश-विदेशात होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना सर्वतोपरी आर्थिक मदत व सहकार्य केले जाते.
  • होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
  • ठाणे जिल्ह्यात प्रथमच राज्यस्तरीय आमदार चषक दिव्यांग जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यात राज्यातून सुमारे 400 हून अधिक दिव्यांग स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.