• महिलांनी सक्षम व्हावे, आर्थिक स्वावलंबी व्हावे, एकत्र यावे यासाठी अनेक बचत गट उभारण्याचे प्रयत्न केले असून अनेकांना प्रसंगी आर्थिक मदत देखील केली आहे. परिणामी मतदार संघात तीन ते चार हजार महिला बचत गटांची स्थापना झाली असून सर्व बचत गटांचा एक महासंघ स्थापन केले आहे. या बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी या दृष्टिकोनातून भव्य बचतगट भवन कल्याण पूर्व येथे उभारण्याचा संकल्प केला आहे. यामुळे महिलांसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
  • दरवर्षी महिला दिनाचे आयोजन करण्यात येते.
  • महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते.
  • महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
  • महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय साठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
  • कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिले.
  • महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळ अंतर्गत दोन्ही भांड्यांची कामे करणाऱ्या 500 हून अधिक गोरगरीब महिलांचे मोफत घरेलू कामगार ओळखपत्र काढून देण्यात आले.