_ZmoJV

नमस्कार,

१४२ कल्याण पूर्व मतदारसंघातून आपण माझ्या निस्वार्थी समाज कार्याची दखल घेऊन सन 2009 सालि मला अपक्ष आमदार म्हणून निवडून दिले व माझ्या पाच वर्षांच्या कामाची पोचपावती म्हणून आपण माझ्यावर विश्वास ठेवून सण 2014च्या निवडणुकीतही पुन्हा अपक्ष म्हणून निवडून दिलेत याबद्दल मी सर्वप्रथम आपले सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.

सन २०१४ च्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीच्या विचाराने तसेच देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र भाई मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्याने प्रेरित होऊन कल्याण पूर्व च्या विकासासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

राज्य सरकारने व माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मला कल्याण पूर्व विधानसभेच्या विकासासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे व या निधीच्या माध्यमातून मी कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक लोकोपयोगी विकास कामे केली आहेत व करत आहे शिवाय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व आरोग्य विषयक अनेक उपक्रम यशस्वी करण्यात आले असून माझ्या मतदारसंघाच्या संपूर्ण व सर्वांगीण विकासाकरिता अनेक लोकोपयोगी अशा विकासकामांचे नियोजन सुरू आहे.

मी १४२ कल्याण पूर्व मतदारसंघातून अपक्ष म्हणून तब्बल दोन वेळा केवळ आपल्यामुळेच निवडून आलो असल्याने मी लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य पार पाडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे वयाचे आपण साक्षीदार आहात मी तुमच्या सर्व लहान मोठ्या कार्यक्रमांमध्ये आणि सुख-दुःखं मध्ये नेहमी सहभागी होण्याचा प्रयत्न केलेला आहे निस्वार्थपणे कोणताही गर्व न बाळगता सर्वसामान्यांना नेहमी उपलब्ध होणारा आपला माणूस आपला आमदार होण्याचा मी नेहमीच प्रयत्न केलेला आहे.

मागील १० वर्षात कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात आमदार या नात्याने जी विकासकामे केली आहेत त्याचा संक्षिप्त लेखाजोगा आपल्या समोर मांडत असताना मला आनंद होत आहे या दहा वर्षात माझ्याकडुन काही अपेक्षा पूर्ण झालेल्या नसतील त्याकरिता क्षमस्व पण मी मतदार संघाच्या विकासासाठी जे काही प्रयत्न केले आहेत ते मनापासून व प्रामाणिकपणे केले आहेत याचे आपण साक्षीदार आहात आणि याचा मला सार्थ अभिमान आहे समाजातील प्रत्येक घटकाच्या सेवेसाठी व सर्व समावेश विकासासाठी मी कटिबद्ध आहे.

धन्यवाद !!

वंदे मातरम भारत माता की जय.