• देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र भाई मोदी यांचे स्वच्छ सुंदर व पर्यावरण मुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे घर स्वच्छ राहिले तर गाव स्वच्छ राहील गाव स्वच्छ राहिले तर शहर स्वच्छ राहील शहर स्वच्छ राहिले तर राज्य स्वच्छ राहील पर्यायाने देश आणि स्वच्छ राहील स्वच्छतेमुळे देशाचे आरोग्य स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे त्यांचा हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कल्याण पुर्वेत रस्ते स्काय व रेल्वेस्टेशन स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता अभियानाचे नियमित आयोजन करण्यात येते.
  • पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षाचे महत्त्व अधोरेखित आहे सध्याच्या काळात जागतिक पातळीवर हवामानातील बदल आणि उष्णतेत होणारी वाढ या संदर्भात मोठ्या प्रमाणात विचार मंथन होत आहे त्यानुसार होणारी तीव्रता व होणारा परिणाम कमी करण्यासाठी एक प्रयत्न म्हणून वनमंत्री मा. ना. श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पुर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात येतो मागेल त्याला मोफत झाड या संकल्पनेतून दरवर्षी मोफत वृक्षाचे वाटप करण्यात येते.