• दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणतीही इतर भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ न स्वीकारता केवळ शैक्षणिक साहित्य स्वीकारून त्यांचे गोर गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जाते.
  • महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक दाखले जलद गतीने मिळण्यासाठी तहसीलदार कल्याण अंबरनाथ उल्हासनगर यांच्या सहकार्याने दरवर्षी दाखले वाटप शिबिराचे आयोजन.
  • दरवर्षी इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
  • बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येते.
  • दरवर्षी दहावी व बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या 2000 हून अधिक विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करून विकासाच्या वाटा या मार्गदर्शन पुस्तकांचे तसेच परीक्षा किटचे वाटप करण्यात येते.
  • M.P.S.C. व U.P.S.C. च्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करून मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात येते.
  • शाळा महाविद्यालय विद्यार्थी पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी मला आमदार म्हणून मिळत असलेल्या पगारातून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात येते.
  • अधिवेशनादरम्यान विधानभवनातील कामकाज कसे चालते हे जाणून घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना अधिवेशन काळात विधान भवनाचे कामकाज पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली.