सस्नेह नमस्कार...!
१४२ कल्याण पूर्व मतदारसंघातून माझ्या निस्वार्थी समाज कार्याची दखल घेऊन सन २००९ व २०१४ साली जनतेने मला अपक्ष
आमदार म्हणून निवडून दिले व माझ्या दहा वर्षांच्या कामाची पोचपावती म्हणून आणि माझ्यावर विश्वास ठेवून सण 2019
च्या निवडणुकीतही पुन्हा भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणून निवडून दिले.
सन २०१४ च्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीच्या विचाराने तसेच देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र भाई मोदी
व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्याने प्रेरित होऊन कल्याण पूर्व च्या
विकासासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
राज्य सरकारने व मा. मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मला कल्याण पूर्व विधानसभेच्या
विकासासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे व या निधीच्या माध्यमातून मी कल्याण पूर्व विधानसभा
क्षेत्रामध्ये अनेक लोकोपयोगी विकास कामे केली आहेत व करत आहे शिवाय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व आरोग्य विषयक
अनेक उपक्रम यशस्वी करण्यात आले असून माझ्या मतदारसंघाच्या संपूर्ण व सर्वांगीण विकासाकरिता अनेक लोकोपयोगी अशा
विकासकामांचे नियोजन सुरू आहे.
मी १४२ कल्याण पूर्व मतदारसंघातून तब्बल तीन वेळा निवडून आलो असल्याने मी लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य पार
पाडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. मी जनतेच्या लहान मोठ्या कार्यक्रमांमध्ये आणि सुख-दुःखं मध्ये नेहमी
सहभागी होण्याचा प्रयत्न केलेला आहे निस्वार्थपणे कोणताही गर्व न बाळगता सर्वसामान्यांना नेहमी उपलब्ध होणारा
आपला माणूस आपला आमदार होण्याचा मी नेहमीच प्रयत्न केलेला आहे.
मी मतदार संघाच्या विकासासाठी जे काही प्रयत्न केले आहेत ते मनापासून व प्रामाणिकपणे केले आहेत. समाजातील
प्रत्येक घटकाच्या सेवेसाठी व सर्व समावेश विकासासाठी मी कटिबद्ध आहे.
मा.आ.श्री.गणपत काळू गायकवाड यांचा अल्प परीचय
नाव |
: |
श्री.गणपत काळू गायकवाड (आमदार - १४२ कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र) |
जन्म |
: |
१४ जुन १९६८ (तिसगांव, कल्याण तालुका) |
जात |
: |
हिंदु आगरी (ओ.बी.सी) |
पत्ता |
: |
वैभव निवास, गोरक्षनाथ मंदिराच्या, पुनालिंक रोड, कल्याण (पूर्व), जि.ठाणे ४२१३०६
|
पत्नी |
: |
सुलभा गणपत गायकवाड ( बहीण लाडकी योजना विधानसभा १४२ कल्याण |
मुले |
: |
१) वैभव गणपत गायकवाड ( भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण जिल्हाध्यक्ष )
२) प्रणव गणपत गायकवाड
|
मुली |
: |
साक्षी गणपत गायकवाड |
राजकीय कारकीर्द
-
२००९ साली सर्वप्रथम १४२ कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातुन अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो.
-
२०१४ साली दुसऱ्यादा १४२ कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातुन अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो व
देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारला बिनशर्थ पाठींबा दिला.
-
२०१५ साली कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकित कल्याण पूर्व क्षेत्रात भारतीय जनता
पक्षाचे १२ नगरसेवक निवडून आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
-
२०१७ साली कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रात प्रभारी म्हणून काम पहिले.
-
२०१८ साली कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक मध्ये भाजपा आणि रिपाई (ए) चे अधिकृत उमेदवार आ.श्री.निरंजन
डावखरे यांच्या निवडणूक प्रचार कार्यात सक्रीय सहभाग.
-
२०१९ साली तिसऱ्यांदा १४२ कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातुन मित्र पक्षाची बंडखोरी मोडीत काढून
भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणून निवडून आलो.
-
२०२२ साली गोवा विधानसभा निवडणूकीमध्ये श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काणकोण मतदार
संघात प्रभारी म्हणून पूर्ण वेळ काम पहिले व पक्षाचे उमेदवार आ.श्री.रमेश तवडकर यांना निवडणून आणण्यास विशेष
प्रयत्न केले.
विविध उपक्रम
-
किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांना संघटीत करून श्री.तिसार्इ फळभाजी वेलफेअर संस्थेची स्थापना करून त्यामार्फत
बेरोजगार लोकासाठी स्वयंरोजगार करण्याची व्यवस्था व आर्थिक मदत तसेच संघटनेमार्फत फेरीवाल्याच्या समस्याचे
निराकरण करण्यात येते.
-
२६ जुलै २००५ रोजी आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस पुरग्रस्त नागरीकांसाठी राहण्या व खाण्याची व्यावस्था.
तसेच पुरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वत: पाण्यात वावरल्यामुळे “लेप्टोपायसीस” आजाराने ग्रस्त झाले होते. तसेच
पूरसदॄष्य परिस्थितीच्या संकटात सापडलेल्या नागरीकांना व्यक्तिश मदत केली तसेच शासनाच्या आर्थिक मदतीचा लाभ
मिळवून दिला.
-
कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातुन माझ्या स्वागतअध्यक्षते खाली सलग ४ वर्ष कल्याण पूर्वेत कोकण
महोत्सवाचे आयोजन करण्यात येते यात दरवर्षी हजारो नागरिक या उत्सवाला भेट देत असतात
-
कोल्हापूर तसेच कोकणातील पूरग्रस्तांसाठी थेट घटनास्थळी जावुन मदत कार्य.
सामाजिक कार्य
-
महिला सशक्तीकरण विविध महिला बचत गटांची स्थापना करून सदयस्थितीत ८०० हून जास्त महिला बचत गटामध्ये ५,०००
पेक्षा जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेले आहे
-
कोरोना महामारीच्या काळात आरोग्य विमा असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. हि बाब लक्षात घेवून मतदार संघातील १२६०
हून अधिक रिक्षा चालकांचा मोफत ५ लाखाचा वैद्यकीय विमा काढून देण्यात आला.