बातम्या आणि कार्यक्रम

विविध उपक्रम

  • किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांना संघटीत करून श्री.तिसार्इ फळभाजी वेलफेअर संस्थेची स्थापना करून त्यामार्फत बेरोजगार लोकासाठी स्वयंरोजगार करण्याची व्यवस्था व आर्थिक मदत तसेच संघटनेमार्फत फेरीवाल्याच्या समस्याचे निराकरण करण्यात येते.
  • २६ जुलै २००५ रोजी आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस पुरग्रस्त नागरीकांसाठी राहण्या व खाण्याची व्यावस्था. तसेच पुरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वत: पाण्यात वावरल्यामुळे “लेप्टोपायसीस” आजाराने ग्रस्त झाले होते. तसेच पूरसदॄष्य परिस्थितीच्या संकटात सापडलेल्या नागरीकांना व्यक्तिश मदत केली तसेच शासनाच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळवून दिला.
  • कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातुन माझ्या स्वागतअध्यक्षते खाली सलग ४ वर्ष कल्याण पूर्वेत कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात येते यात दरवर्षी हजारो नागरिक या उत्सवाला भेट देत असतात.
  • कोल्हापूर तसेच कोकणातील पूरग्रस्तांसाठी थेट घटनास्थळी जावुन मदत कार्य.

सामाजिक कार्य

  • महिला सशक्तीकरण विविध महिला बचत गटांची स्थापना करून सदयस्थितीत ८०० हून जास्त महिला बचत गटामध्ये ५,००० पेक्षा जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेले आहे
  • कोरोना महामारीच्या काळात आरोग्य विमा असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. हि बाब लक्षात घेवून मतदार संघातील १२६० हून अधिक रिक्षा चालकांचा मोफत ५ लाखाचा वैद्यकीय विमा काढून देण्यात आला.

धार्मिक कार्ये

  • महिला सशक्तीकरण विविध महिला बचत गटांची स्थापना करून सदयस्थितीत ८०० हून जास्त महिला बचत गटामध्ये ५,००० पेक्षा जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेले आहे
  • कोरोना महामारीच्या काळात आरोग्य विमा असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. हि बाब लक्षात घेवून मतदार संघातील १२६० हून अधिक रिक्षा चालकांचा मोफत ५ लाखाचा वैद्यकीय विमा काढून देण्यात आला.

धार्मिक कार्ये

  • धार्मिक कार्यक्रमाचे सातत्यने श्री तिसार्इ केबलच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे दिड लाखाहून अधिक नागरिक घर बसल्या या कार्यक्रमाचा घरबसल्या आस्वाद घेत असतात.
  • तथागत गौतम बुध्दांच्या अस्थि कल्याण नगरीत प्रथम आल्या असता त्यांचे विधीवत स्वागत व भव्य शोभायात्रेसाठी मोलाचे सहकार्य
  • नरेंद्र महाराज संप्रादाय अंतर्गत नरेंद्र महाराज यांच्या दर्शन व प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन केले.
  • कल्याणात दुसऱ्या अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेचे आयोजन, महामानव डॉ.बाबासहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी विनामुल्य अन्नदान वाटप.
  • मराठी नव वर्षा दिनी स्वामी नरेंद्र महाराज संस्थान यांच्या अंतर्गत हिदू नव वर्ष स्वागत यात्रेचे कल्याण पूर्वेत दरवर्षी आयोजन.
  • दरवर्षी मतदार संघातील सार्वजनिक गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव व इतर सणामध्ये सांस्कॄतीक कार्यक्रम आयोजीत करण्यासाठी ३०० हून अधिक मंडळांना प्रोत्साहन देवून आर्थिक मदत करण्यात येते.
  • ६ डिसेंबर रोजी प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिवशी बाहेरून येणाऱ्या त्यांच्या असंख्य अनुयायांसाठी कल्याण रेल्वे स्थानकात अन्नदान केंद्र उभारून सर्वेतोपरी मदत करण्यात येते या अन्नदान केंद्रात २००० हून अधिक नागरिक याचा लाभ घेतात.

क्रिडा

  • राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेन्द्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतुन देशातील सर्वात मोठा क्रिडा महोत्सवाचे कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे २५००० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला.
  • कल्याण शहराचे नाव लौकिक करण्यासाठी व खेळाडूना आपले गुण कौशल्य दाखविण्यासाठी क्रिडा साहित्य देण्यात येते तसेच देश विदेशात होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना सर्वोतोपरी आर्थिक मदत व सहकार्य केले जाते.
  • ठाणे जिल्ह्यात प्रथमच १२ वी राज्यस्तरीय आमदार चषक दिव्यांग जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यात राज्यातून सुमारे ४०० हून अधिक दिव्यांग स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.
  • विरोधी पक्ष नेता, माजी मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब चषक अंतर्गत कै.अनिल महादेव कर्पे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
  • होतकरू खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी तिसाई श्री या नावाने जिल्हा स्तरीय शरीर शौष्ठव स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

ग्राम विकासाचा भागीरथी प्रयत्न

  • कल्याण पुर्व मतदार संघातील पाण्याची समस्या असलेल्या ठिकाणी नागरीकांसाठी कुपनलिका खोदुन हॅडपंप बसविण्यासाठी १८ लक्ष ५० हजार आमदार निधी उपलब्ध करून दिला आहे.
  • ग्रामिण भागातील पाणी टंचार्इवर मात करण्याकरिता मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये गावाचा समावेश करून ४ कोटी ८५ लक्ष निधी मंजुर करून घेतला.
  • ग्रामिण रस्त्याच्या कामांसाठी करोडो रूपयांचा निधी उपलब्ध करून आणला आहे. या निधीतुन रस्त्यांचे कामे करण्यात आलेली आहेत व प्रस्तावित आहेत.
  • ग्रामिण भागात स्मशानभूमी, साकव, शेततळे, समाज मंदिर, सामाजिक सभागृह बनविण्यात आलेले आहे.
  • ग्रामिण भागात विजेची समस्या सोडवण्यासाठी जास्त क्षमतेचे विद्युत ट्रान्सफॉमर बसविण्यात आले जुन्या व जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या व विज वाहक तारा बदलण्यात आल्या आहेत.
  • आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत अंबरनाथ तालुक्यातील पोसरी हे गाव दत्तक घेऊन गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.
  • अंबरनाथ तालुक्यातील एम.आय.डी.सी.पाईप लाईन टाकण्यासाठी, कुशिवली पाठबंधारेसाठी, सामाईक भराव भुमी प्रकल्प व विरार ते अलिबाग पर्यतची बहुउद्देशिय वाहतुक मार्गीकेसाठी बाधित झालेल्या भुमी पुत्र शेतकऱ्यावर कोणताही अन्याय होवु नये यासाठी भुमी पुत्र शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवुन देण्यासाठी वारंवार बैठका घेवुन व पत्रव्यवहार करून सर्वोतोपरी मदत केली.

लोकहितासाठी संघर्ष व आंदोलने

  • स्वता:च्या न्याय व हक्कासाठी झालेल्या नेवाळी आंदोलनादरम्यान जखमी आदोलकांना सर्वतोपरी वैद्यकीय मदत करून आंदोलक शेतक-यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेवुन शेत जमिनी शेतकऱ्याना परत मिळवून देण्याकरिता ठोस उपाययोजणा करण्या बाबत मुख्यमंत्री महोदय व संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून प्रसंगी विधानभवना बाहेर आंदोलन केले.
  • भीमा कोरेगाव प्रकरणामुळे कल्याण पूर्वेत निर्माण झालेला सामाजिक तणाव दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांकडे आग्रही मागणी केली.
  • चक्की नाका ते नेवाळी हा श्रीमलंग गड या मुख्य रस्त्याची झालेली दुरावस्था यामुळे सतत निर्माण होणारी वाहतूक कोंडी व नेहमी होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी रस्ता रुंदीकरणकरून व डांबरीकरण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून प्रसंगी प्रशासनाच्या विरोधात उपोषण करून सदर रस्त्याचे काम करून घेतले.
  • कल्याण स्टेशनपासुन कल्याण पुर्वेत सुमारे १ कि.मी. रेल्वे यार्डातुन पायी यावे लागत होते. सदर स्काय वॉकसाठी स्वत: आमदार नसतांना सन २००५ पासुन सातत्याने प्रयत्न करून एम.एम.आर.डी.ए.च्या माध्यमातुन कल्याण पूर्व येथे स्कायवॉक प्रकल्प मंजुर करून काम तातडीने सुरू करून घेतले. संथ गतीने होत असलेल्या स्काय वॉकच्या कामासाठी संबंधीत विभागाशी पाठपुरावा करून प्रसंगी महापालिका विरोधात उपोषण करून स्काय वॉकचे काम पुर्ण करून नागरीकांसाठी खुला करून घेतला व नागरीकांच्या सुरक्षीततेच्या दॄष्टीने या स्काय वॉकवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसविण्यासाठी पाठपुरवा करून सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसविण्यात आले.
  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त लोकनेते दि.बा.पाटील साहेबांचेच नाव देण्यात यावे या मागणीसाठी महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठीव विधानभवनाच्या बाहेर जोरदार निदर्शने केली. सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून सिडकोला घेराव आंदोलनात तसेच मानवी साखळी आंदोलनात सहभागी झालो.

रोजगार

  • बेरोजगार युवक युवतींसाठी रोजगार मेळावा तसेच जॉबकार्ड शिबिराचे आयोजन करण्यात येते आज रोजी पर्यत हजारो युवक युवतींना नोकरी मिळवून दिल्या.
  • कौशल्य विकास योजनेअंतर्गत ३८०० युवक-युवतींना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मिती करण्यात आली.

शिक्षण

  • दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमीत्त कोणतीही इतर भेटवस्तु किंवा पुष्पगुच्छ न स्विकारता केवळ शैक्षणिक साहित्य स्वीकारूण त्यांचे गोरगरीब व गरजूंना वाटप केले जाते.
  • महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक दाखले जलद गतीने मिळण्यासाठी तहसीलदार कल्याण, अंबरनाथ व उल्हासनगर यांच्या सहकार्यांने दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात येते. सदर शिबीराची दखल घेवुन प्रधान सचिव श्री.स्वाधीन क्षत्रीय यांनी भेट दिली.
  • महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक दाखले जलद गतीने मिळण्यासाठी तहसीलदार कल्याण, अंबरनाथ व उल्हासनगर यांच्या सहकार्यांने दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात येते. सदर शिबीराची दखल घेवुन प्रधान सचिव श्री.स्वाधीन क्षत्रीय यांनी भेट दिली.
  • बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येते.
  • दरवर्षी दहावी व बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या २००० हून अधिक विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करून “विकासाच्या वाटा” या मार्गदर्शन पुस्तकांचे तसेच परीक्षा किटचे वाटप करण्यात येते.
  • M.P.S.C. व U.P.S.C च्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करून मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात येते.
  • अधिवेशना दरम्यान विधानभवनातील कामकाज कसे चालते हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिवेशन काळात विधानभवनाचे कामकाज पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली.
  • पैशा अभावी शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये आमदार म्हणून मिळत असलेल्या मानधनातून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सतत मदत करण्यात येत आज रोजी पर्यत ५००० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली.
  • इयत्ता १०वी व १२ वीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळयाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. या सोहळ्यात विद्यार्थ्यांसमवेत त्यांच्या आई वडिलांचा देखील सत्कार करण्यात येतो.

पर्यावरण स्वच्छ भारत अभियान

  • देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रभाई मोदी यांचे स्वच्छ, सुंदर व पर्यावरणयुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेद्नजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबविण्यास सुरूवात झाली आहे. घर स्वच्छ राहिले तर गाव स्वच्छ राहिल… गाव स्वच्छ राहिले तर शहर स्वच्छ राहिल... शहर स्वच्छ राहिले तर राज्य स्वच्छ राहिल, पर्यायाने देशही स्वच्छ राहिल. स्वच्छतेमुळे देशाचे आरोग्यही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. त्यांचा हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कल्याण पूर्वेत रस्ते, स्काय वॉक, रेल्वे स्टेशन स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता अभियानाचे नियमित आयोजन करण्यात येते.
  • पर्यावरणाचा समतोल रोखण्यासाठी वृक्षाचे महत्त्व अधोरेखित आहेत सध्याच्या काळात जागतिक पातळीवर हवामानातील बदल आणि वैश्विक उष्णतेत होणारी वाढ या संदर्भात मोठ्या प्रमाणात विचार मंथन होत आहे. त्यानुसार होणारी तीव्रता व होणारा परिणाम कमी करण्यासाठी एक प्रयत्न म्हणून वन मंत्री मा.ना.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात येतो. “मागेल त्याला मोफत झाड” या संकल्पनेतून दरवर्षी मोफत वृक्षाचे वाटप करण्यात येते.

शासकीय योजना

  • प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजने अंतर्गत ५००० हून नागरिकांना मोफत आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड बनवून दिले.
  • महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना अंतर्गत २५००० हून अधिक नागरिकांना मोफत हेल्थ कार्ड बनवून दिले.
  • मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत गंभीर आजारावरील रुग्णाच्या उपचारासाठी सुमारे १ करोड १० लाख २५ हजार ३०० रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली.
  • इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजने अंतर्गत २०० हून अधिक इतर बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळवून दिला.
  • मुद्रा योजने अंतर्गत लघु उद्योगांना व्यवसायासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले.
  • प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजने अंतर्गत २००० हून अधिक नागरिकांचा मोफत अपघाती विमा काढून दिला.
  • प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत अनेक महिलांना मोफत गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात आले.
  • घरेलु कामगार योजने अंतर्गत ५०० हून अधिक घरकाम करणाऱ्या महिलांना मोफत घरेलु कामगाराचे ओळखपत्र काढून देण्यात आले.
  • ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासात सवलत मिळवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळामार्फत मोफत बस पास काढून देण्यात आले.
  • देशाचे आदरणीय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेतील प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतून "प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेतून १००० हून अधिक पथविक्रेत्या बांधवांना खेळते भांडवल म्हणून १०,०००/- रुपये कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले.
  • ई-श्रम हे असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी मोदी सरकारने उचललेले महत्वपूर्ण व ऐतिहासिक पाऊल आहे. भारत देशाच्या अर्थव्यवस्थेत सिंहाचा वाटा असणाऱ्या असंघटित क्षेत्रातील ३००० हून अधिक नागरिकांना/श्रमिकांना/कामगारांना नागरिकांचे ई श्रम कार्ड काढून देण्यात आले.
  • दिव्यांग व्यक्तींना साहित्य, पेन्शन तसेच विविध शासकीय योजनेच्या माध्यमातुन मदत करण्यात येते आज रोजी पर्यत १२०० हून अधिक दिव्यांग व्यक्तींना मदत करण्यात आली.

सांकृतिक

  • महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा जपण्याच्या दृष्टीने कल्याण पूर्वेत सर्वपक्षीय हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे दरवर्षी माझ्या अध्यक्षतेखाली भव्य स्वरुपात आयोजन करण्यात येते. या शोभा यात्रेमध्ये सर्व जाती धर्माचे नागरिक मोठ्या प्रमाणात सामिल होवून हिंदू संस्कृतीची जोपासना करीत असतात.
  • दरवर्षी गणेशोत्सवा दरम्यान कल्याण पूर्व विधानभा क्षेत्रामधिल घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देण्यात येते.

जेष्ठ नागरिक

  • जेष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जेष्ठ नागरीकांचा सत्कार करण्यात येतो.
  • ३०० हून अधिक ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळाच्या बस प्रवासामध्ये सवलतीसाठी मोफत स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.
  • ५०० हून अधिक ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी तहसील कार्यालयामार्फत मोफत ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र काढून देण्यात आले.
  • ज्येष्ठ नागरिकांना शिर्डी व शनी शिंगणापूर दर्शन घडविण्यात येते; आज रोजी पर्यत २००० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतला.
  • दरवर्षी १००० हून जेष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात येते.
  • राज्य सरकारच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजनेच्या माध्यमातून अनेक जेष्ठ नागरिकांना दरमहा पेन्शन सुरु करून देण्यात आली.

जनता दरबार

  • नियमीत जनता दरबाराचे आयोजन करून मतदारांबरोबर राज्य सरकारची विविध खाती आणि महापालिका अधिकारी यांच्याशी संबंधीत नागरिकांच्या समस्यांची चर्चा करण्यासाठी मला भेटु शकतात. हया दरबारामुळे नागरीकांच्या समस्या चांगल्या प्रकारे समजण्याचे तसेच त्यांना त्यांच्या लोकशाही पद्धतीने लोकप्रातिनिधीला भेटण्याची संधी मिळते असे दुहेरी कार्य पार पडते. राजकारणा बरोबरच मी समाजाचे देखील देणे लागतो ही बाब लक्षात घेऊन समाजातील रूग्ण, महिला, विद्यार्थी, जेष्ठ नागरीक व सुशिक्षीत बेरोजगांच्या समस्या सोडविण्याचा माझा प्रयत्न असतो.

महिला सक्षमिकरण

  • महिलांनी सक्षम व्हावे, आर्थिक स्वावलंबी व्हावे, एकत्र यावे यासाठी अनेक बचतगट उभारण्याचे प्रयत्न केले असुन अनेकांना प्रसंगी आर्थिक मदत देखील केली आहे, परिणामी मतदार संघात तीन ते चार हजार महिला बचत गटांची स्थापना झाली असुन सर्व बचत गटांचा एक महासंघ स्थापन केले आहे. या बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळावी या दृष्टीकोनातून भव्य बचत गट भवन कल्याण पूर्व येथे उभारण्याचा संकल्प केला आहे. यामुळे महिलांसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
  • दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यात आरोग्य शिबिर, विविध स्पर्धेचे आयोजन.
  • महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले.
  • कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिले.
  • महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार कल्याण मंडळ अंतर्गत धुनी भांडयाची कामे करणाऱ्या ५०० हून अधिक गोर गरीब महिलांचे मोफत घरेलु कामगार ओळखपत्र काढून देण्यात आले.

शेतकरी सन्मान

  • शेतकरी हा ग्रामिण भागाचा कणा आहे. शेतकऱ्यांना मदत व्हावी त्यांचे शेती उत्पन्न वाढावे. शेती सोडून इतर व्यवसायासाठी अर्थ सहाय्य किंवा इतर वस्तुरूपाने सहाय्य करता यावे या दृष्टिने शासनाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहचवण्यासाठी विशेष प्रयत्न केला आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना पुरामुळे झालेल्या त्यांच्या शेतीच्या नुकसानीची दखल घेऊन बांध बंधीस्तीसाठी शासनाकडून निधी मिळवून दिला. शेतकऱ्यांसाठी विशेष शिबिरे व प्रात्यक्षिके आयोजीत करून त्यांना उत्पादन जास्त कसे घेता येईल, या संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केला. ग्रामिण भागात शेतकऱ्यांना पंप, विळे, बियाने, खते, रोपे, ताडपत्री इत्यादी सामग्री शासनाच्या विविध योजनांतून मिळवून दिली तसेच शेती पुरक व्यवसायासाठी मदत म्हणुन शासनाच्या विविध योजनांमधून शेती गट वाटप, संकरित गायी वाटप, सुधारीत जातीचा बोकड वाटप, तलंगा वाटप, म्हैस वाटप, चारा पिक बियाने वाटप इत्यादी योजनांतून शेतकऱ्यांना मदत केली.
  • अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंग गड परिसरामधील शेतकऱ्याच्या भात शेतीचे पुर परिस्थितीमुळे बाधीत झालेल्या शेती पिकांचे पंचनामे देखील करण्यात आले होते. परंतु २ वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना कोणतीही मदत न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झालेला होता. याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळवून दिले.
  • अंबरनाथ तालुक्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) लगतच्या जमिनीवरील शेतकऱ्याच्या ७/१२ वर किमान १५ ते १६ वर्षापासून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) अशा नोंदी टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जमिनी विकणे, विकसित करणे अथवा जमिनीवर कर्ज काढणे शक्य होत नाही. सदर जमिनी ह्या शेतकऱ्याच्या उपजिविकेचे साधन असल्याने स्थानिक भूमिपुत्राच्या जमिनीच्या ७/१२ वरील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) अशी नोंद कमी करण्याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहे.
  • अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी परिसरातील सुमारे १६०० एकर जमीन ही ब्रिटीश काळापासून विमानतळाच्या प्रयोजनासाठी संपादीत केली आहे. परंतु सद्य स्थितीत वापराविना पडून आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी भूमीहीन झाला आहे. सदरची जमीन ही संबंधित शेतकऱ्यांच्या ताब्यात असून ती जमीन शेतकऱ्यांना परत करण्यासाठी शासनाकडे मी वारंवार पाठपुरावा केला आहे. याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी केंद्रीय संरक्षणमंत्री महोदयांसोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहेत.
  • अंबरनाथ तालुक्यातील प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PMKMY) या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली.

मिळालेले पुरस्कार

  • दि. इंडियन इकोनोमिक डेव्हलेपमेंट अॅन्ड रिसर्च असोसियेशन नवी दिल्ली यांच्याकडून १९ डिसेबर २००८ रोजी “बिजनेस लिडरशिप अवार्ड फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट”.
  • ऑल इंडिया अचिवर्स फाऊंडेशन, दिल्ली यांच्याकडून दि. २० ऑगस्ट २००९ रोजी “राजीव गांधी राष्ट्रीय एकता सन्मान”.
  • साप्ताहिक मंत्रालय वार्ता यांच्याकडून दि. ११/०८/२०११ रोजी “समाज भुषण” पुरस्कार.
  • समाज कार्याची दखल घेऊन दिल्लीच्या ‘रिडरा’ या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून “बिजनेस लिडरशिप” पुरस्कार.
  • दिल्लीच्या ऑल इंडिया अविवर्स फाऊंडेशन या संस्थेकडून “राजीव गांधी एकता पुरस्कार”.
  • कल्याण पूर्वेतील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने “शिव कल्याण” पुरस्काराने सन्मानित.
  • गोर गरीब नागरिकांच्या मालमत्तेवर महापालिकेने सरसकट १२५% शास्ती दंड आकारून जो नाहक त्रास देऊन गोरगरीब नागरिकांना आर्थिक भुर्दंड पडत होता. तो शास्ती कर रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब तसेच राज्यशासनाकडे पाठपुरावा करून दि. ११ जानेवारी २०१७ रोजी या प्रकरणात राज्यशासनाने शासन निर्णय काढून संपूर्ण महाराष्ट्रातील ६०० चौ.फुटापर्यंत निवासी बांधकामांवरील शास्ती कर रद्द करून संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब नागरिकांना दिलासा देण्यात आलेला आहे. ह्या कामगिरीमुळे दि. १० सप्टेंबर २०१९ रोजी “लोकमत पॉलीटिकल आयकॉन मुंबई” हा पुरस्कार देण्यात आला.

व्यवसाय

  • श्री तिसार्इ केबल सर्व्हिसेस प्रा.लि.
  • जरीमरी सॅटेलार्इट सर्व्हिसेस
  • श्री तिसार्इ सॅटेलार्इट सर्व्हिसेस
  • श्री तिसार्इ हेल्थ क्लब
  • श्री तिसार्इ डेव्हलपर्स
  • श्री तिसार्इ एग्रो फॉर्म

विविध सामाजिक संस्थेमध्ये भुषवित असलेले पद :-

अध्यक्ष श्री तिसार्इ प्रतिष्ठाण, कल्याण
अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोक हित वर्धक संघ
अध्यक्ष कल्याण तालुका हौशी शरीर शौष्ठव संघटना
अध्यक्ष हिंदु नव वर्ष स्वागत यात्रा समिती
अध्यक्ष ठाणे जिल्हा साहसी क्रिडा असोसिऐशन
संस्थापक संत गाडगेबाबा लॉन्ड्री चालक मालक असोसिऐशन
उपाध्यक्ष श्री तिसार्इ नागरीक सहकारी पतपेढी
संस्थापक श्री तिसार्इ फळ भाजी वेलफेअर संस्था
सल्लागार सार्वजनिक शिव जयंती उत्सव समिती