१४२ कल्याण पूर्व मतदारसंघातून माझ्या निस्वार्थी समाज कार्याची दखल घेऊन सन २००९ व २०१४ साली जनतेने मला अपक्ष आमदार म्हणून निवडून दिले व माझ्या दहा वर्षांच्या कामाची पोचपावती म्हणून आणि माझ्यावर विश्वास ठेवून सण 2019 च्या निवडणुकीतही पुन्हा भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणून निवडून दिले.
सन २०१४ च्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीच्या विचाराने तसेच देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र भाई मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्याने प्रेरित होऊन कल्याण पूर्व च्या विकासासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
राज्य सरकारने व मा. मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मला कल्याण पूर्व विधानसभेच्या विकासासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे व या निधीच्या माध्यमातून मी कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक लोकोपयोगी विकास कामे केली आहेत व करत आहे शिवाय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व आरोग्य विषयक अनेक उपक्रम यशस्वी करण्यात आले असून माझ्या मतदारसंघाच्या संपूर्ण व सर्वांगीण विकासाकरिता अनेक लोकोपयोगी अशा विकासकामांचे नियोजन सुरू आहे.